Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून अनिल परब, ज.मो. अभ्यंकर रिंगणात; शिक्षक-पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत
त्यानुसार राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena (UBT)) पक्षाने आपल्या दोन उमेदवारींची नावे जाहीर केली आहेत.
विधान परिषद निवडणूक 2024 साठी (Vidhan Parishad Election 2024) निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena (UBT)) पक्षाने आपल्या दोन उमेदवारींची नावे जाहीर केली आहेत. शिवसेना (UBT) मध्यवर्ती कार्यालयातून ही नावे जाहीर केली आहेत. ज्यामध्ये आमदार अनिल परब (Anil Parab) आणि ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांच्या नावाचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर पुढच्या काहीच तासांमध्ये ठाकरे गटाकडून ही नावे जाहीर झाली आहेत.
शिवसेना (UBT) पक्षाने अनिल परब यांच्या नावाची घोषणा मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून केली आहे. तर, ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडले असताना निकालाची प्रतिक्षा आहे. तत्पूर्वीच आघाडी घेत ठाकरे गटाने नावांची घोषणादेखील केली आहे. (हेही वाचा, Vidhan Parishad Election 2024: महाराष्ट्रात लोकसभेनंतर लगेच विधानपरिषद निवडणूक; शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात पुन्हा सामना)
उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू
अनिल परब यांना संसदीय राजकारणाचा चांगला अनुभव आहे. महाविकासआघाडी सरकार आणि त्या आधीच्याही युतीच्या सरकारांमध्ये त्यांनी विविध खात्यांचा कार्यभार मंत्री म्हणून सांभाळला आहे. दुसऱ्या बाजूला ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासून म्हणून ओळखले जातात. तसेच, ते स्वत: वकीलही आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे परिवहन मंत्रालयाचा कार्यभार होता. या आधी ते 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना रिंगणात उतरवले आहे.दरम्यान, येत्या 27 जुलै रोजी विधानपरिषद सदस्य म्हणून अनिल परब यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. तत्पूर्वीच ठाकरे गटाने त्यांना मैदानात उतरवले आहे. (हेही वाचा, Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर, 26 होणार जूनला मतदान)
ज. मो. अभ्यंकर
दरम्यान, ज. मो. अभ्यंकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील चांगला अनुभव आहे. सध्या ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे प्रांताध्यक्षही आहेत. विविध सामाजीक प्रश्न आणि समस्या यांची त्यांना जाणआहे. शिवाय महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष यांसारख्या पदांवरुनही त्यांनी चांगले काम केले आहे.
विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम
विधान परिषदेसाठी 31 मे 7 जून या कालावधीत अर्ज भरण्याची मूदत आहे. अर्जाची छाननी 10 जून रोजी होईल. दाखल केलेले अर्ज परत घेण्याची मूदत 12 जून पर्यंत असेल. मतादनाची तारीख 26 जून रोजी मतदान होणार आहे. झालेल्या मतदानाची मोजणी 1 जुलै रोजी होणार आहे.