IPL Auction 2025 Live

संजय राऊत यांच्यासोबत Uddhav Thackeray यांची परखड मुलाखत

ठाकरेंच्या कार्यकत्यांसाठी ही मुलाखत दिशादर्शक असण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Sanjay Raut Interview | (Photo Credit - Twitter)

Uddhav Thackeray Sanjay Raut Interview Teaser: शिवसेना पक्षात बंड झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख असताना हे घडलं. पुढे शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे देखील एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने बहाल केलं. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या मनात या सर्वांबद्दल नेमकं आहे तरी काय? याबातब उत्सुकता आहे. नाही म्हणायला काही पत्रकार परिषदा आणि जाहीर कार्यक्रम, सभा आदींच्या माध्यमातून ते व्यक्त झालेत खरं. पण सविस्तर असं ते कधी बोलले नाहीत. दरम्यान, त्यांच्या मनात काय हे लवकरच महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची शक्यता आहे. दैनिक सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव यांची घेतलेली एक दणदणीत मुलाखत लवकरच प्रसिद्ध होत आहे. ठाकरे गटासाठी (Uddhav Thackeray Faction) ही मुलाखत दिशादर्शक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन उद्धव यांच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. एकाच टेबलवर आमनेसामने बसलेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पाठीमागे गडद निळ्या रंगाच्या पडद्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उठावदार प्रतिमा असे नैपथ्य व्हिडित दिसते. शिवाय 'आवाज कुणाचा, वर्षातील सर्वात मोठा स्फोटक आणि थेट भाग लवकरच' ही दमदार अक्षरेही वाचकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. एकूणच काय तर लवकरच या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे परखड भाष्य करण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, CM Eknath Shinde शिंदे यांच्या शिवसेनेत वाद, ठिणगी पडली, घ्या जाणून)

व्हिडिओ

ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या टीझरवर मुलाखती कोणत्या दिवशी प्रदर्शीत होणार आहे याची नेमकी तारीख स्पष्ट नाही. पण, त्याचाही उलघडा नजिकच्या काही काळात होण्याची शक्यता आहे. ही मुलाखत काही भागांमध्ये प्रदर्शीत होणार असल्याचे जाणवते. प्रदीर्घ काळ उद्धव ठाकरे सलग आणि स्पष्ट बोलले नाहीत. त्यामुळे या मुलाखतीच्या माध्यमातून का होईना, शिवसेनेतील बंड, महाविकासआघाडीचे भविष्य, उद्धव ठाकरे यांचे ध्येय आणि धोरण शिवाय न्यायालयीन लढा या सर्वांवर सर्वांगिण भाष्य केले जाऊ शकते. अर्थात, प्रत्यक्षात मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी केलेले गौप्यस्फोट, टीका आणि विचार स्पष्ट होणार आहेत. तोपर्यंत उत्सुकता वाढविण्याचे काम ट्विटरवरील टीझरने केले आहे इतकेच म्हणता येईल.