'उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील जर...' वरिष्ठ कॉंग्रेस नेत्याने दिला इशारा
त्या सर्वांना कठोर शब्दात ते म्हणाले, "योग्य प्रकारे वागा नाहीतर उद्धव ठाकरे राजीनामा देतील."
महाराष्ट्रात महाविकासआघाडीच्या सरकारने खाते वाटपासाठी वेळ लावला. परंतु, खातेवाटप झाल्यानंतरही अनेक नेत्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याबद्दल, अखेर काँग्रेसच्याच एका नेत्याने इतरांना समज द्यायचा ठरवला आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांना जणू सतर्कतेचा इशाराच दिला आहे. अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात करण्यात आलेल्या पोर्टफोलिओ वाटपावर असंतोष व्यक्त केला आहे. त्या सर्वांना कठोर शब्दात ते म्हणाले, "योग्य प्रकारे वागा नाहीतर उद्धव ठाकरे राजीनामा देतील."
एका सभेला संबोधन करत असताना गडाख म्हणाले, "जर आपले (कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी) मंत्री बंगले व विभागांचे वाटप यासारख्या मुद्द्यांवरून सरकारच्या कामात अडथळा आणत असतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त होतील आणि राजीनामा देण्यास भाग पाडतील."
दरम्यान, विरोधी पक्ष असलेल्या भाजपाची भूमिका मात्र पक्षातील अनेक नेत्यांनी स्पष्ट केली आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, विरोधी पक्ष असलेल्या भाजपला महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या कामकाजात अडथळे निर्माण करण्यास रस नाही. तसेच ते असंही म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या "कौशल्यामुळे" आघाडी सरकार चालवण्याचे कठीण काम शक्य झाले आहे.
तर दुसरीकडे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी युती सरकार अधिक काळ टिकणार नाही असा दावा गेल्या आठवड्यात केला होता. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष हा सरकार खाली आणण्याचा प्रयत्न करीत नाही.