CM Uddhav Thackeray Visits Osmanabad: आम्ही फक्त आकडे फेकत नाही, जे बोलतो तेच करतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला
आज त्यांनी उस्मानाबाद (Uddhav Thackeray Osmanabad Visits) येथील तुळाजपूर येथील काटगाव आणि अपसिंगा परिसराला भेट दिली.
जे मी बोलतो तेच करतो. जे बोलत नाही ते मी करत नाही. मी इथे आकडे फेकायला नव्हे तर तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. त्यामुळे धीर सोडू नका, खचून जाऊ नका. हे तुमचे सरकार आहे, असा शब्दात पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलासा दिला आणि विरोधकांना टोला लगावला. सर्व पाहणी करुन लवकरच योग्य ती मदत शेतकऱ्यांना केली जाईल. जे शक्य आहे तेच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Visits Osmanabad) यांनी या वेळी सांगितले.
मख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे झालेल्य नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी उस्मानाबाद (Uddhav Thackeray Osmanabad Visits) येथील तुळाजपूर येथील काटगाव आणि अपसिंगा परिसराला भेट दिली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी छोटेखणी भाषण केले. या भाषणात ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray to Visit Osmanabad: अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 21 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)
उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, राज्यातील शेतकऱ्याने स्वत:ला एकटं समजू नये. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. हे संकट अद्याप दूर झाले नाही. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, राज्यात पुन्हा एकदा परतीचा मुसळधार पाऊस येऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या. कोणत्याही स्थितीत प्राणहाणी होणार नाही याकडे लक्ष द्या. झालेल्या नुकसाणीची भरपाई कशी करायची याकडे राज्य सरकारचे लक्ष आहे. लवकरच मदत जाहीर केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. या ठिकाणी मी केवळ आकडे सांगायला नाही तर, आपल्याला दिलासा द्यायला आणि आपले आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.
दरम्यान, मी अनेक वर्षे उस्मानाबाद जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो आहे. परंतू, माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवात मी कधीही इतका मोठा पाऊस पाहिला नाही. यंदाचा पाऊस खरोखरच भयावह आहे, अशी भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वेळी व्यक्त केली.