Uddhav Thackeray On SC Decision: 'सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निर्णय' - उद्धव ठाकरे यांनी दिली सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया
त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं ही कायदेशीररित्या चूक ठरली असेल पण या गद्दारांकडून अविश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणं मला तेव्हाही मान्य नव्हतं आजही मान्य नसेल असे म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आपला निर्णय दिला आहे. या निर्णयामध्ये कोर्टाने प्रतोद निवड आणि राज्यपालांची भूमिका बेकायदेशीर असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यामुळे आपण स्थिती पूर्ववत आणू शकत नाही असं म्हणत शिंदे सरकार (Shinde Government) वाचलं असल्याचा निर्णय दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हे सत्तासंघर्षाच्या प्रकरणातील टर्निंग पॉईंट ठरला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं ही कायदेशीररित्या चूक ठरली असेल पण या गद्दारांकडून अविश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणं मला तेव्हाही मान्य नव्हतं आजही मान्य नसेल असे म्हटलं आहे. जर सध्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. त्यामुळे यावर आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका मांडणार हे पहावं लागणार आहे. Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात शिंदे-फडणवीस यांचं महाराष्ट्रातील सरकार वाचलं; Eknath Shinde यांना मोठा दिलासा .
सर्वोच्च न्यायालयाने प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांना कायम ठेवण्याचं तसेच अपात्रतेचा निर्णय देखील विधानसभा अध्यक्षांनी आता द्यावा असं म्हटलं आहे.यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी फूटीरांचा व्हीप आता मला मान्य नाही. त्यामुळे माझ्याच शिवसेनेचा व्हिप कायम राहणार असं उद्धव ठाकरेंंचं मत आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील शिक्षा मिळायला हवी असं म्हटलं आहे.
निवडणूक आयोग ब्रम्हदेव नाही मतांच्या टक्केवारीवर असं कोणाला नाव, पक्ष चिन्हं देखील देणं चूकीचं असल्याचं ते म्हणाले आहे. आपल्याकडून शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह काढलं जाऊ शकत अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे.
मातोश्री वर मीडीयाशी बोलताना उद्धव ठाकरेंसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव देखील होते. सध्या आपण आमच्यासाठी नाही तर देशाला वाचवण्यासाठी, संविधानाला वाचवण्यासाठी त्याच्या विरोधकांसमोर एकत्र लढत असल्याचं म्हटलं आहे.