उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा कणा मोडला; निसर्ग चक्रीवादळ मुद्द्यावरून नितेश राणे यांची जळजळीत टीका

यात शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तुम्ही शिवसेनेचा (Shivsena) कणा मोडला असा स्पष्ट आरोप लगावला आहे.

Nitesh Rane And Uddhav Thackeray (Photo Credits: File Image)

निसर्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) कोकणावर ओढावलेलं संकट आपण सर्वांनीच पाहिलं, अजूनही रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथील प्रभावित भाग स्थिरस्थावर झालेले नाही. अशावेळी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) कडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत सवाल करत भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी एक ट्विट केले आहे. मुख्य म्हणजे यात त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तुम्ही शिवसेनेचा (Shivsena) कणा मोडला असा स्पष्ट आरोप लगावला आहे. निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी राज्य सरकारने प्रस्ताव केंद्राला अजून पाठवलेला नाही यातूनच सरकारचे कोकणावरचे प्रेम दिसून येत आहे, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दौरे फक्त फोटो काढण्यापूरतेच होते अशा शब्दात नितेश राणे यांनी राज्य सरकारवर जहाल टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांच्यावर 'खुनाचा प्रयत्न' हे कलम लावण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश; नारायण राणे मुलाला वाचवण्यात अपयशी

नितेश राणे यांनी पुढे ट्विट मध्ये, "बाळासाहेब म्हणायचे कोकण शिवसेनेचा कणा आहे.. पण उद्धव ठाकरेंनी कणाच मोडून टाकला!!!" असे म्हणत थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं आहे. अजित पवार चालवतायत राज्य, बाकीचे फक्त फेसबुक लाईव्ह करण्यात व्यस्थ; नितेश राणे यांचे खरमरीत ट्विट

नितेश राणे ट्विट

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच निसर्ग चक्रीवादळ नंतर देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचा आढावा घेतला होता, यानुसार, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी अनुक्रमे 372.97 कोटी, 116.78 कोटी व 37.11 लाख इतका निधी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून वितरीत करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.