Shiv Sena and Dhanushya Baan ECI Controversy: निवडणूक आयोगाविरुद्ध उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सूनावणी; शिवसेना आणि धनुष्य बाणावर निर्णयाबाबत उत्सुकता

या याचिकेवर आज (बुधवार, 22 फेब्रुवरी) दुपारी 3.30 वाजता सुनावणी होणार आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited)

शिवसेना (Shiv Sena) पक्ष नाव व धनुष्यबाण (Dhanushya Baan) ही निशाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल करण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (बुधवार, 22 फेब्रुवरी) दुपारी 3.30 वाजता सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्माण झालेल्या संवैधनिक पेचावर सुरु असलेल्या पाच न्यायाधीसांच्या खंडपीठाची सुनावणीही आज पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिका मंगळवारी सूचिबद्ध झाली. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली होती. मात्र, न्यायालयाने यावर आपण बुधवारी दुपारनंतर सुनावणी घेऊ असे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या आजच्या सूचिपत्रिकेतही या याचिकेचा उल्लेख आहे. त्यामुळे या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेविरोधात एकनाथ शिंदे गटाने कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालया दोन्ही बाजू ऐकूण घेण्याची शक्यता आहे. हे सगळे होत असतानाच राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांचे अधिकार, शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली भूमिका यावरुन निर्माण झालेला पेच यावर दाखल याचिकांवर घटनापीठासमोर या आगोदरच सुनावणी सुरु आहे. (हेही वाचा, Chief Of Shiv Sena: शिवसेना पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदे यांची निवड; कार्यकारिणी बैठकीमध्ये घेतला निर्णय)

दरम्यान, कोर्टात घटनापीठासमोर मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपील सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. पक्षात फूट पडल्याचा दावा शिवसनेतेतील कोणत्याच गटाने केला नाही. जर विधिमंडळ पक्षाचा नेता निवडायचा असेल तर तो संबंधित पक्षातून निवडला जायला हवा. पण एकनाथ शिंदे यांच्याबाबत असे काहीच घडले नाही. त्यांची पक्षनेता निवड कशाच्या आधारावर करण्यात आली? निवडणूक आयोगासमोर दाखल झालेल्या याचिकेवर नजर टाकल्यास 18 जुलै पर्यंत शिवसेनेतील कोणत्याही बैठकीचा उल्लेख आढळत नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्याबाबत होणारे सर्व निर्णय हे पक्षाबाहेरच होत होते, असे स्पष्ट दिसते, असाही युक्तीवाद कपील सिब्बल यांनी केला.