Uddhav Thackeray on Rahul Gandhi's speech: उद्धव ठाकरे यांच्याकडून राहुल गांधी यांचे समर्थन; भाजपच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह (Watch Video)

लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi Speech) यांनी भाजप, आरएसएस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती.

UddhavThackeray on Rahul Gandhi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे समर्थन केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi Speech) यांनी भाजप, आरएसएस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. या भाषणादरम्यान, हिंदुत्त्वाच्या ( Hindutva) मुद्द्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला होता. तसेच, त्यांनी हिंदुत्त्वाचा अपमान केल्याचाही आरोप केला होता. भाजपच्या या आरोपाबाबत विचारले असता उद्धव ठाकरे मुंबई येथे बोलत होते.

भाजपच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवला आणि भाजपच्या हिंदुत्वाच्या व्याख्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गांधींनी संसदेत केलेल्या भाषणात हिंदू धर्माचा अपमान केल्याच्या आरोपाला ठाकरे यांनी आव्हान दिले. "मला सांगा त्यांनी काय चूक केली? त्यांनी (हिंदू धर्माचा) कुठे अपमान केला?" असा सवाल ठाकरे यांनी केला. गांधींना भगवान शिवाचे चित्र दाखवू न देण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली आणि अशा कृती खऱ्या हिंदुत्वाशी सुसंगत आहेत का असा सवाल केला. ठाकरे यांनी जोर दिला की त्यांचा पक्ष देखील "जय श्री राम" चा नारा लावतो आणि निवडणूक रॅलींमध्ये पंतप्रधान उघडपणे घोषणा वापरतात याकडे लक्ष वेधले. "परंतु भाजप सोडून इतर कोणी संसदेत असे म्हटले तर तो गुन्हा आहे का?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (हेही वाचा, नरेंद्र मोदी सत्य हटवू शकता, पुसू शकत नाहीत; भाषणातील भाग वगळल्यानंर राहुल गांधी यांचा आक्रमक पलटवार)

राहुल गांधी यांच्याकडून हिंदुत्त्वाचा अपमान नाही

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वाचा अपमान केला नसल्याचे ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. "भाजपचा अर्थ हिंदुत्व नाही'', असे ते स्पष्ट शब्दात म्हणाले. ''आम्हीही हिंदू आहोत आणि आमच्यापैकी कोणीही हिंदुत्वाचा अपमान करणार नाही आणि हिंदुत्वाचा अपमान सहनही करणार नाही. त्यात राहुलजींचाही समावेश आहे," असे ठाकरे म्हणाले. त्यांनी पुनरुच्चार केला की, आमच्या पक्षाला हिंदुत्व समजले आहे, ते भाजपच्या राजकीय अस्मितेपेक्षा पवित्र आणि वेगळे आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi On BJP Over Hinduism: राहुल गांधी आक्रमक; लोकसभेत झळकवले भगवान शिव शंकराचे पोस्टर, हिंदुत्वावरुन भाजपवरही जोरदार टीका)

एक्स पोस्ट

ठाकरे यांचा हुकमी एक्का मैदानात

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी संसदीय राजकारणात आणखी एक डाव टाकला आहे. ठाकरे यांचे पीए आणि निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहातील 11 रिक्त जागा भरण्यासाठी मतदान होत आहे. "माझे आई-वडील आणि शिवसेना संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच पक्ष शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला," अशी भावना मिलींद नार्वेकर यांनी अर्ज भरताना व्यक्त केली.