Shiv Sena Spokesperson List: संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते; खासदार अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर यांच्यासह 10 जणांची प्रवक्तेपदी निवड
शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून आज (8 सप्टेंबर) मुख्य प्रवक्ते म्हणून संजय राऊत (Sanjay Raut) आणि 10 अन्य प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून आज (8 सप्टेंबर) मुख्य प्रवक्ते म्हणून संजय राऊत (Sanjay Raut) आणि 10 अन्य प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये ही यादी प्रसिद्ध करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मुख्य प्रवक्तेपदी संजय राऊत यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant), परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab), उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) , पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane), आमदार निलम गोऱ्हे (Neelam Gorhe), मुंबई महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) , आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), आमदार सुनिल प्रभू (Sunil Prabhu) आणि शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांची निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी आता संजय राऊत यांच्यासोबत 10 प्रवक्ते काम करणार आहेत. मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्येही शिवसेना पक्षाची बदनामी करण्यासाठी हेतुपुरस्कर काही जणांना बसवण्यात आल्याचा आरोप वारंवार शिवसेना पक्षाकडून करण्यात आला होता. आता शिवसेनेची भूमिका परखडपणे समाजमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी एकूण 11 शिवसैनिक काम करतील.
संजय राऊत आता शिवसेना पक्षाच्या मुखपत्राची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारताना त्याचसोबतच मुख्य प्रवक्ते म्हणून काम पाहतील. दरम्यान वयाच्या 29 वर्षापासून ते संपादक म्हणून काम करत आहेत. मागील काही दिवसांपासून कंगना रनौत सोबतचा शाब्दिक कलगीतुरा असेल किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये शिवसेना पक्षाला गोवण्याचा प्रयत्न असेल. यावरून अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या.