Udayanraje Bhosale On Shiv Sena: शिवसेना पक्षातील घडामोडींवरुन उदयनराजे भोसले यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
शिवसेना (Shiv Sena) कुणाची? या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांनी उदयनराजे यांना विचराले असता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
भाजप (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर खोचक भाष्य केले आहे. शिवसेना (Shiv Sena) कुणाची? या मुद्द्यावर प्रसारमाध्यमांनी उदयनराजे यांना विचराले असता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. शिवसेना ही जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने स्थापन झाली. तर मग आता मी म्हणायचे का शिवसेना माझी? असा खोचक प्रश्न विचारत उदयनराजे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला टोला लगावला आहे.ते पुणे येथे शुक्रवारी (१२ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उदयनराजे यांनी शिवसेनेत खरोखरच बंड झालं आहे का? असा प्रश्न विचारत आपल्याला त्याबाबत काहीच माहिती नाही. पण प्रसारमाध्यांनी खोदून विचारले आणि शिवसेना कुणाची हा वाद सुरु असल्याचेही म्हटले. यावर उदयनराजे यांनी म्हटले की, 'अरे वा, मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे.' (हेही वाचा, Loksabha Election Maharashtra: महाविकासआघाडी टिकली तर भाजपला धक्का, फक्त नियोजनाची गरज; सर्व्हेत धक्कादायक वास्तव)
या वेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजे यांच्यात एक फरक समजून घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही स्वत:ला राजे म्हणत नसत. पण, तरीही त्यांची जनतेचे राजे अशीच ओळख आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांची आज एक बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबईत शिवसेनाच क्रमांक एकचा पक्ष राहिल असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.