IPL Auction 2025 Live

Satara Loksabha By Election Result 2019: सातारा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले पिछाडीवर

Udayanraje Bhosale | (Photo credit : Facebook)

Satara Loksabha By Election Result 2019: संपूर्ण राज्याचे लक्ष विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election Result) निकालाकडे लागले आहे. आज सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या मतदारसंघासाठी 21 ऑक्टोबरला पोटनिवडणुक घेण्यात आली. तसेच आज याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) तिसऱ्या फेरीत 10 हजार मतांनी  पिछाडीवर असून राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आघाडीवर आहेत.

उदयनराजे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उदयनराजे यांच्यावर टिका केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस  आघाडीतर्फे अखेर श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

विद्यमान खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्याविरोधा आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत गेली प्रदीर्घ काळ चर्चा आणि उत्सुकात होती. सुरुवातीच्या काळात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव चर्चेत होते. परंतु, श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.