Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी UBT शिवसेना 26 मार्च रोजी जाहीर करणार उमेदवारांची पहिली यादी
शिवसेना (UBT) रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, सांगली आणि मावळ या जागांसाठी उमेदवार जाहीर करू शकते.
Lok Sabha Elections 2024: शिवसेना (UBT) लोकसभा निवडणुकीसाठी 15-16 जागांची पहिली यादी मंगळवारी प्रसिद्ध करणार आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सांगितले की, पक्ष मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करेल. शिवसेना (UBT) रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, सांगली आणि मावळ या जागांसाठी उमेदवार जाहीर करू शकते.
यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, 15-16 जागांसाठी आमची उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर होणार आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असावेत, अशी आमची इच्छा आहे. त्यांनी आमच्यासोबत राहावं यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. आता ते स्वीकारायचे की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. MVA मध्ये 4-5 पक्ष आहेत, त्यामुळे सर्वांना त्यांचा वाटा मिळाला पाहिजे. आम्ही व्हीबीएला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. मला वाटते की ही, एक चांगली ऑफर आहे आणि आंबेडकरांनी मागितलेल्या जागांपैकी या जागा आहेत. (हेही वाचा - Ram Satpute Vs Praniti Shinde: काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचे पत्र, भाजप Candidate राम सातपुते यांच्याकडून 'जय श्रीराम' म्हणत प्रत्युत्तर)
वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत नसली तरी आम्ही जिंकू, आमच्यासोबत लोक असल्यामुळे MVA जिंकेल. जनता आमच्या पाठीशी आहे, प्रकाश आंबेडकर हे आदरणीय नेते असून त्यांची संघटना आमच्या पाठीशी आहे. आम्ही त्यांना अनेक मागण्या केल्या आहेत. त्यांनी आमचा प्रस्ताव स्वीकारायला हवा होता आणि आम्हाला अजूनही आशा आहे की ते आमचा प्रस्ताव स्वीकारतील, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.