Pune News: फिरण्यासाठी लोणावळा गाठलं, अन्...........दुदैवाने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास प्रियांक आणि विजय यादव आणि काही मित्र हे खाणीत असलेल्या पाण्यात उतरले. त्यानंतर जे घडलं ते अगदी दुदैवीच.

Drowned In Lonavala (Photo credit- pixabay)

Pune News: पावसाळ्यात लोणावळ्यात फिरायल्या आलेल्या दोन पर्यटनांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लोणावळ्यात आपल्या मित्र परिवारासोबत फियारला आलेले असताना ही घटना घडली आहे. प्रियांक व्होरा आणि विजय यादव अशी मृत व्यक्तीची नावे होती. 8 जुलै रोजी पर्यटन मंडळी फिरण्यासाठी लोणावळा येथील वरसोली परिसरात फिरत होते. त्याना सुट्ट्या असल्यामुळे बाहेर फिरायला आले होते.

कसा झाला मृत्यू

वरसोली परिसरात एका खाणीत पाणी साचलेले होते. त्यामुळे तीन जणांनी पाण्यात पाय सोडून बसण्याचे ठरवले. पाण्यात पाय सोडत असताना त्या तिघांचा पाण्यात पाय अचानक घसरला आणि तीन जण पाण्यात बुडाले. दरम्यान इतर मित्रांना ही प्रकरण कळताच मदतीसाठी आरडाओरड केला. काही स्थानिकांनी पटकन रेस्क्यू- टिमला बोलवले. रेस्क्यू टीम  ने दोघांना बाहेर काढले आणि स्थानिकांच्या मदतीने एका तरुणीला सुखरुप बाहेर काढले. दोघांच्या तोंडात आणि नाकात पाणी भरपुर शिरलं होते.  त्यांना बाहेर काढण्याल्या नंतर त्यांच्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली.  पाण्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची संपुर्ण माहिती लोणावळा पोलीस ठाण्यात देण्यात आली.

काही दिवसांपुर्वी देखील ओंकार गायकवाड नावाच्या तरुणाचा धबधब्यात पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. कुंडमाळा धबधब्यात पाय घसरुन त्यांचा मृत्यू झाला.  मित्रांसोबत फिरण्यासाठी धबधब्यात आला असताना ही घटना घडली. या प्रकरणात पोलीसांनाही तात्काळ खबर देण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement