Mumbai News: एटीएममधून पैसे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक, मालाड पोलिसांकडून कारवाई

अलीकडे चोरीच्या अनेक घटना वाढत चालले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे.

ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

Mumbai News: अलीकडे चोरीच्या अनेक घटना वाढत चालले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. दरम्यान एटीएम मशिनवर प्लॅस्टिकची पट्टी लावून पैसे काढून नागरिकांना फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले होते. या घटनेअंतर्गत पोलिसांनी चोरांना पकडले आहे. मालाड पोलिस या संदर्भात कारवाई करत आहे.या टोळीनी एटीएममधून पैसे चोरण्यासाठी मोठी शक्कल लढवली होती ते पाहून पोलिसही हैरान झाले आहेत. या घटनेनंतर मालाड परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पोलिसांनी या टोळीतील दोन जणांना अटक केले आहे. अटक करण्यात आलेल्या २ जणांवर मुंबई आणि पुण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. चोरट्ये टोळी एटीएम मशिनवर पट्टी लावून देत आणि एटीएमच्या बाहेर थांबत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहक  आल्यावर बाहेर थांबायचे. मशीनमध्ये पैसै काढण्याच्या प्रयत्नात असताना, एटीएम मशीनमधून पैसे बाहेर पडत नाहीत. कदाचित मशिन घराब असेल असं ग्राहकांना वाटायचे. त्यामुळे ग्राहक तिथून निघायचे. त्यानंतर चोरटे आत घूसून, यानंतर हे चोरटे एटीएममध्ये घुसून अडकलेली रक्कम प्लास्टिकची पट्टी काढून घेत आणि पैसे लंपास करत.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यानंतर चोरीच्या प्रकरण्याच्या मालाड परिसरात घटना घडल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मालाड येथून दोन चोरट्यांना अटक केले. पोलिसांनी या प्रकरणी चोरांकडे असलेली पट्टी देखील जप्त केली आहे.