Maratha Reservation: हिंगोलीत दोन दिवसांत दोघांची आत्महत्या, मराठा आरक्षणाची केली होती मागणी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोघांनी आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली युवती मंगळवारी हिंगोली -कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर माळधामणी फाट्यावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होती. आरती शिंदे असं युवतीचे नाव होते. गोंविदा कावळे असं मृत तरुणाचे नाव होते. नहाद घटनास्थळावर वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शासनाला अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिले. गोंविदाने नहाद परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवले. आत्महत्या करण्याऱ्यापुर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहली ज्यात त्याने मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असं उल्लेख केला. अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.
आरती शिंदे हीनं मंगळवारी रात्या रोको आंदोलनात प्रत्यक्ष भाग घेतला होता. तीनं बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तीने आरक्षणाची मागणी केली होती. दोन दिवसांत दोन तरूणाने आयुष्य संपवले त्यामुळे पुन्हा एकदा मुद्दा संतापला आहे. या घटनेमुळे गावात शोककला पसरली आहे.