Mumbai Airport Closed for 6 Hours: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्या ६ तास बंद, नेमक कारण काय?

 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन धावपट्ट्या ९ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तास बंद राहतील.

Mumbai-Airport-Runways

Mumbai Airport Closed for 6 Hours: मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या काम(Maintenance Work)साठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ(Mumbai Airport)च्या दोन धावपट्ट्या आज ९ मे २०२४ रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. सहा तासांसाठी या धावपट्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दोन्ही धावपट्ट्या सकाळी ११.०० वाजल्यापासून ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अशा सहा तासांसाठी बंद राहतील, असे विमानतळ ऑपरेटर एमआयएएल (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) ने म्हटले आहे. त्याबाबतच प्रसिद्धीपत्रक त्यांच्याकडून काढण्यात आलं आहे. या विमानतळावरून दररोज सुमारे ९५० विमानांची वर्दळ असते.देखभालीच्या कामामुळे त्याचा परिणाम विमान सेवेवर होणार आहे. विमानसेवा काही काळासाठी थांबणार आहे. (हेही वाचा:Gold Seized at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर 5.71 कोटी रुपयांचे 9.4 किलोपेक्षा जास्त सोने जप्त; 8 जणांना अटक)

“मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसाळी आपत्कालीन योजनेचा एक भाग म्हणून प्राथमिक धावपट्टी ०९/२७ आणि दुय्यम धावपट्टी १४/३२ ९ मे २०२४ रोजी तात्पुरती कार्यान्वित राहणार नाही”, असे विमानतळ प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.

सीएसएमआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, "मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी याआधीही पावसाळी आपत्कालीन योजनेचा भाग म्हणून मुंबई विमानतळाची धावपट्टी एक दिवस बंद ठेवण्यात आली. मात्र, आता विमानतळाच्या १४/३२ आणि ०९/२७ या दोन्ही धावपट्ट्या बंद राहतील." धावपट्टी बंद करणे हे दरवर्षी गरजेनुसार होत राहते.