मानखुर्द परिसरात सामुहिक बलात्काराचा प्रयत्न, पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात

मानखुर्द गॅंगरेपच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या प्रणय समाधान इंगळे (21) आणि अमोल निर्मल (19) हे तरूण साठे नगरचे रहिवासी आहेत.

Gang Rape in Mumbai |(Archived, edited, representative images) | Photo Credits: File Photo

Mankhurd Gang Rape: मुंबईत काही वर्षांपूर्वी झालेल्या शक्ती मिल परिसरातील सामुहिक बलात्कारानंतर आता अजून एक सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. 24X7 जागी असणारी मुंबई आजही महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित नसल्याचं वास्तव पुन्हा समोर आलं आहे. मुंबईच्या मानखुर्द (Mankhurd) परिसरामध्ये एका 30 वर्षीय महिलेवर गॅंग रेप (Gang Rape) करण्याच्या आरोपाखाली दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गुरूवार आणि शुक्रवार रात्री मुंबईमध्ये हा गॅंगरेप झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शुक्रवारी संध्याकाळी पोलिस स्टेशनमध्ये गॅगरेपची तक्रार नोंदवण्यात आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेया दोन व्यक्तींना कोर्टात दाखल करण्यात आले असून 24 जानेवारी 2019 पर्यंत त्यांना पोलिस कस्टडीमध्ये ठेवण्यात येणार आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस अधिक तपास करत आहेत.

गॅंगरेपच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या प्रणय समाधान इंगळे (21) आणि अमोल निर्मल (19) हे तरूण साठे नगरचे रहिवासी आहेत.17 जानेवारीच्या रात्री साठे नगरहून एक महिला उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी येत होती. दरम्यान 11 वाजल्याच्या सुमारास

महिलेवर घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर गॅंगरेप झाल्याची तक्रर करण्यात आली आहे.

आरोपींवर Section 376 (D),34 IPC,323 यांच्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्य दोन आरोपींचा अधिक तपास सुरू आहे.

मानखुर्द, शिवाजी नगर लिंक रोड परिसरामध्ये अनेक गैरकृत्य घडत असल्याच्या वारंवार तक्रारी आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif