Mumbai News: उच्चभ्रू इमारतीच्या लिफ्टमध्ये दोघे जण अडकले, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर, समतानगर पोलिस ठाण्यात कंपनीवर गुन्हा दाखल

मुंबईच्या कांदिवलीत एका उच्चभ्रू इमारतीच्या लिफ्टमध्ये दोघे जण अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

LIFT PC Pixabay

Mumbai News: मुंबईच्या कांदिवलीत एका उच्चभ्रू इमारतीच्या लिफ्टमध्ये दोघे जण अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त पोलिस महानिरिक्षक शशिकांत शिंदे यांचा मुलगा आणि नातू अडकले होते. ही घटना रविवारी घडली आहे. दुपारच्या वेळीस साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कांदीवलीतील चॅलेंजर टॉवरमध्ये घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा- लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन आदळली, 62 वर्षीय महिला जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोघे जणा सहाव्या मजल्यावरून खाली उतरत असताना घडली. लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावर बंद पडली. त्यावेळी अजिंक्य शिंदे आणि त्यांचा साडेतीन वर्षाचा मुलगा आर्यवर शिंदे हे लिफ्टमध्ये अडकले. तीन तास लीफ्टमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर कांदिवलीतील समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर अपार्टमेंट मधील नागरिकांनी संपात व्यक्त केला. त्यानंतर कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. लिफ्टमध्ये अडकल्यानंतर दोघांन्ही आरडाओरड करत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लिफ्टमध्ये कोणीतरी अडकल्याची माहिती सिक्युरिटीला समजले. त्यानंतर सिक्युरिटीने इतर नागरिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेची माहिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येणास देखील उशीर केला त्यामुळे आणखीने संताप व्यक्त केला जात आहे.