Cyber Fraud: लोणावळा, गोवा, अलिबाग मध्ये न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूभीवर Villa Bookings चं आमिष दाखवत लुबाडणार्‍या दोघांना अटक; Mumbai Police यांचं फसवणूक झालेल्यांनी समोर येण्याचं आवाहन

बुकिंगसाठी नंबर देखील दिला होता.

Arrest । Image Used For Representational Purpose (Photo Credits: Facebook)

सायबर पोलिसांनी (Cyber Police) न्यू इयर आणि क्रिसमस सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर लोणावळा, गोवा, अलिबाग मध्ये विला बुकिंग करण्याचं आमिष दाखवत दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी खोटी वेबसाईट बनवून विला, रिसॉर्ट्सअचे बनावट फोटो अपलोड केले होते. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग घेत ग्राहकांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी सध्या विविध 12 ठिकाणांवरून एफआयआर रजिस्टर केले आहेत.

मिड डेच्या वृत्तानुसार, आरोपी हे Aakash Rupkumar Jadhwani आणि Avinash Rupkumar Jadhwani हे भाऊ आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन्स, डेबिट कार्ड्स जप्त केले आहेत. पोलिसांनी ज्यांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी समोर येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहन केले आहे. नक्की वाचा: अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, आरोपींनी इंस्टाग्राम वर @luxury.villas.lonavala हे अकाऊंट बनवलं होतं.

 Mumbai Police Tweet  

अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, आरोपींनी इंस्टाग्राम वर @luxury.villas.lonavala हे अकाऊंट बनवलं होतं. एका महिला ग्राहकाने 6 डिसेंबरला त्यांनी दिलेल्या नंबर वर कॉल करत 31 डिसेंबर साठी बुकिंग साठी चौकशी केली. त्यावेळी 72 हजार रूपये मागण्यात आले होते. लोणवळा मध्ये हे बुकिंग करण्यासाठी व्यवहार झाल्यानंतर तिला इमेल कन्फरमेशन देखील पाठवण्यात आलं. पण जेव्हा तिने केअर टेकरला फोन केला तेव्हा तो अनरिचेबल दाखवला. व्हिला च्या मालकासोबत जेव्हा तिचा संपर्क झाला तेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी डेबिट कार्डच्या माध्यमातून आरोपीला ट्रेस केलं आहे.