नाशिक मध्ये आढळले 2 नवे COVID-19 रुग्ण, जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 48 वर
नाशिक मध्ये 2 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 48 वर गेली आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) हैदोस घातला असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच जात आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 3 हजाराच्या पार गेला आहे. याच कारणास्तव सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवसांसाठी वाढवले आहेत. कोरोनाच्या लढाईत विविध स्तरातून मदत केली जात आहे. नाशिक (Nashik) मध्ये 2 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून या जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 48 वर गेली आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असून कोविड-19 प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात 286 नवे रुग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात सर्वाधित कोरोना बाधितांची संख्या असलेल्या मुंबईत कोरोनाचे नवे 107 रुग्ण आढळले असून येथील कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 2043 वर जाऊन पोहोचली आहे.
हेदेखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात आतापर्यंत 23 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह
कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध स्तरातून मदत केली जात आहे. दुसऱ्या बाजूला डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करण्यात येत आहेत.
भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 12759 वर पोहचला आहे. त्यामध्ये 420 जणांचा मृत्यू आता पर्यंत कोरोनामुळे झाला आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता सरकार विविध नियमांचे अंमलबजावणी करत असल्याचे दिसून येत आहे. तर पीपीई किट आणि मास्क उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.