Mumbai: माहीम समुद्रकिनारी पोहताना दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

मुलांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना दाखल केल्यावर मृत घोषित करण्यात आले.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Mumbai: माहीम समुद्रकिनारी (Mahim Beach) रविवारी समुद्रात पोहताना दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आलं. यासंदर्भात पोलिसांनी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी तीन मुले पोहण्यासाठी समुद्रात गेली तेव्हा ही घटना घडली.

या घटनेत 12 वर्षे वयोगटातील दोन मुले बुडाली, तर एकाची सुखरूप सुटका करण्यात आली. मुलांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना दाखल केल्यावर मृत घोषित करण्यात आले. मृत मुलं ही धारावी आणि कुर्ला भागातील रहिवासी आहेत. (हेही वाचा - Pune Shocker: एक वर्षाच्या चिमुकल्याची उकळत्या पाण्यात बुडवून हत्या; आरोपीचे मुलाच्या आईसोबत अनैतिक संबंध)

पोलिसांनी दोन अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यापूर्वी मुंबईतील समुद्रकिनारी पोहायला आलेल्या अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लहान मुलं तलावात तसेच विहिरीमध्ये पोहण्यासाठी जातात. मात्र, अशावेळी सावधानता बाळगणं आवश्यक आहे.

पोहताना सोबत ट्यूब किंवा इतर बचाव साहित्य ठेवणं आवश्यक आहे. तसेच लहान मुलांनी तलावात किंवा समुद्रात पोहताना जाताना आपल्यासोबत एखाद्या मोठ्या व्यक्तीला सोबत नेल्यास दुर्घटना टाळली जाऊ शकते. त्यामुळे योग्य काळजी घेऊन उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घेण्याचा सल्ला पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.



संबंधित बातम्या