Buldhana Accident: अज्ञात वाहनाची धडक कारला, दोन जणांचा मृत्यू, बुलढाणा येथील घटना

अज्ञात वाहनाच्या धडक लागल्याने कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा येथे घडली आहे.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Buldhana Accident: अज्ञात वाहनाच्या धडक लागल्याने कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा येथे घडली आहे. तर कारमधील एक जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना खामगाव बाळापूर मार्गावरील हॉटेल सुदर्शन ढाब्याजवळ 31 मार्च (रविवारी) घडली आहे. सांयकाळी सात वाजता घरी परतत असताना ही घटना घडली. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. (हेही वाचा- अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ शीख समुदयाचाही 'अबकी बार 400 पार

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील कुटुंब हे घरी जात होते. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी होते. रामराव लक्ष्मण माळोदे यांचा मुलगा डॉ. निलेश रामराव माळोदे आणि रामराव यांच्या पत्नी संगीता माळोदे हे तिघे जण कारमध्ये होते. निलेश यांच नुकतच लग्न झालं होतं. ते होळी साजरासाठी इंदौरला गेले होते. इंदौरवरून घरी परत असताना बाळापूर येथे आले. गावाच्या जवळ पोहोचताच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

अकोला येथील खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला समोरून धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की, कार तीन ते चार वेळा पलटली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मुलासोबत आईचे ही निधन झाले. तर रामराव माळोदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघातात नववधूचा संसार उध्द्वस्त झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.