Pune: म्हशीने घरासमोर घाण केल्याने दोन कुटुंबात हाणामारी; पुण्यातील बंडगार्डन परिसरातील घटना

Pune: आपण आतापर्यंत कुत्र्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे दोन गटात हाणामारी झाल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. म्हशीने घरासमोर घाण केल्याने निर्माण झालेल्या वादातून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. पुण्यातील बंडगार्डन परिसरात ही घटना घडली. हाणामारीचं हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं असून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील बंडगार्डन परिसरात एका म्हशीने हर्षल मल्लाव यांच्या घरासमोर घाण केली होती. त्यानंतर त्यांनी म्हशीच्या मालकाला यासंदर्भात जाब विचारला. यादरम्यान दोघांमध्ये शिवीगाळ झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोघांचे नातेवाईकही यात सामील झाले. या सर्व प्रकारानंतर काही स्थानिक तरुणांनी दोन्ही कुटुंबियांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणात हर्षल मल्लाव आणि म्हशीचा मालक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. (हेही वाचा -

पोलिसांनी या घटनेची दखल घेत हर्षल मल्लाव, राहुल काची आणि यश मल्लाव या तिन आरोपींना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, बंड गार्डन परिसरातील या भागात अनेक दिवसांपासून जनावरांचा गोठा आहे. यापूर्वीही अनेकदा जनावरांवरून वाद झाले आहेत. म्हशीच्या शेणावरून झालेल्या वादामुळे या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पुण्यात पोपट वारंवार शिट्ट्या मारतो म्हणून पोपच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोपटाच्या मालकावर खडकी पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.