ठाणे येथील नागरी स्मशानभुमी मधील 2 कर्मचाऱ्यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह
या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकजण हा वाहन चालक असून तर दुसरा हा मृतदेह पाहण्यासह ते घेऊन जाण्याचे काम करतो.
ठाण्यातील नागरी स्मशानभुमी मधील 2 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकजण हा वाहन चालक असून तर दुसरा हा मृतदेह पाहण्यासह ते घेऊन जाण्याचे काम करतो. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्यांची कोरोनाची चाचणी केल्यास ती पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत ठाणे स्मशानभुमीचे महापालिकेतील इनचार्ज एस के महावरकर यांनी माहिती दिली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांच्या परिवाला सुद्धा क्वारंटाइन करण्यात आले आहे.
ठाण्यातील युनिट चीफ ऑफ नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) सचिन शिंदे यांनी स्मशानभुमीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. कारण हे कर्मचारी कोरोनाच्या सुद्धा मृतदेहांचे घेऊन जाण्याचे काम करत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाचे पीपीई किट्स देण्यात यावेत. कारण सध्या या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे पीपीट किट्स दिले आहेत.(Coronavirus: चिंताजनक! अंधेरी-जोगेश्वरी कोरोनाचे नवे हॉटस्पॉट; एका दिवसात 166 नवे रुग्णांची नोंद)
दरम्यान, ठाण्यात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या 17306 वर पोहचली असून 425 जणांचा बळी गेला आहे. तर महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात 3,427 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,04,568 वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात 3830 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, तर चांगली माहिती अशी की 49346 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 51379 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.