Nashik News: नाशकात स्वाईन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू, मनपा अलर्ट मोडवर

स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो.

Nashik News: नाशकात स्वाईन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू, मनपा अलर्ट मोडवर

नाशिकमध्ये (Nashik News) स्वाईन फ्लूमुळे दोघांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये शहरातील 50 वर्षीय पुरूष तर दिंडोरीतील (Dindori) 42 वर्षीय महिलेचा समावेश आहे. यामुळे नाशिकमधील स्वाईन फ्लू बळींची संख्या आठवर गेली असून आतापर्यंत शहरातील 28 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. गेल्याच आठवड्यात नाशिकमधील जेलरोड भागातील 58 वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूनंतर रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. (हेही वाचा - Highest Ever Temperature in India: नागपुरने मोडले देशातील उष्णतेचे सर्व विक्रम; तापमान 56 अंश सेल्सिअसवर- Reports)

जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचे 23 बाधित रुग्ण आढळून आले होते. एप्रिलमध्ये जेलरोड येथील 59 वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने या आजाराचे गांभीर्य वाढले. त्यानंतर मे महिन्यात सिन्नर मधील दातली गाव येथील एका 63 वर्षीय महिला, मालेगाव येथील 65 वर्षीय व्यक्ती आणि 29 वर्षीय महिला, निफाड येथील 68 वर्षीय महिला तर कोपरगाव येथील 65 वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. नाशिकमध्ये आठ मृत्यू झाल्यानंतर मनपा प्रशासन अलर्ट मोडवर आली असून इतर स्वाईन फ्लूच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती शिंकतो किंवा खोकतो. जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसात संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2024 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).