Firing On Female Journalist: पुण्यात महिला पत्रकारावर गोळीबार केल्याप्रकरणी चार अल्पवयीनांसह दोघांना अटक; शस्त्रे जप्त

पीडित तरुणी 27 मे रोजी रात्री दुचाकीवरून घरी जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी पीडितेच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली व कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिली.

Gun Shot | Pixabay.com

Firing On Female Journalist: पुण्यातील महिला पत्रकारावर गोळीबार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली असून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे (वय 20, रा. राजेंद्रनगर, दत्तवाडी) आणि अभिषेक शिवाजी रोकडे (वय 22, रा. नांदेड गाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून एक देशी पिस्तुल, जिवंत काडतुसे, तीन कोयते, चार दुचाकी, तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पत्रकारावर गोळीबार करण्यासाठी आरोपींना कथितरित्या पैसे मिळाले होते. पीडित तरुणी 27 मे रोजी रात्री दुचाकीवरून घरी जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी पीडितेच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली व कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर 11 जूनच्या रात्री महर्षीनगर परिसरात आरोपींनी पीडितेवर गोळ्या झाडल्या. सुदैवाने गोळी चुकली आणि तिच्या डोक्यावरून गेली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Suicide In ST Bus at Palghar: एसटी बस चालकाचा सहकर्मचार्‍यांचा त्रासाला कंटाळून बस मध्येच आत्महत्येचा प्रयत्न)

पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान या गुन्ह्यातील दोन आरोपी लोणीकंद येथील पेरणेफाटाजवळ आश्रय घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यानुसार पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्या साथीदाराला पुण्यातील धायरीजवळील नांदेड गावातून अटक केली. आरोपी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.