Crime: पुण्यामध्ये पिता-पुत्राच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, सात आरोपींचा शोध सुरू

अन्य सात आरोपींचा शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

या आठवड्याच्या सुरुवातीला लोणीकंद (Lonikand) परिसरात तरुण आणि त्याच्या वडिलांच्या हत्ये (Murder) प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) शुक्रवारी दोघांना अटक (Arrest) केली. अन्य सात आरोपींचा शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. प्रतीक कंद आणि आशुतोष शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश उर्फ ​​सनी शिंदे, त्याचे वडील कुमार शिंदे आणि आई कारमधून जात असताना 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास लोणीकंद परिसरातील एका शाळेजवळ हल्लेखोरांनी त्यांना अडवले. हेही वाचा Mumbai: कुलाबा येथील वकील-सिनेमा निर्माता याला POCSO कायद्याअंतर्गत अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वादातून हल्लेखोरांनी सनीवर हल्ला केला. तसेच त्याचे आई-वडील आणि चालकावरही हल्ला केला. सनी आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर त्याची आई आणि चालक जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी त्याच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी कांद आणि शिंदे यांना अटक केली.