Tuljabhavani Mandir: तुळजाभवानीच्या दागिन्यांमध्ये वजनाची तफावत, सोन्याचा मुकूट गायब; चौकशीची मागणी
तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
तुळजाभवानी (Tuljabhavani) मातेला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या शुद्धतेत प्रचंड तफावत आढळून आली असून सोन्यात तर 50 टक्के तूट आढळली आहे. विशेष म्हणजे मातेला वाहण्यासाठी आणलेल्या 4 तोळ्याचा सोन्याचा पादुका चक्क ताब्यांचा असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने (Tuljabhavani Mandir Sansthan Bhakt) कुणालाही पाठिशी न घालता सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी दागिन्यांची तपासणीसाठी नेमलेल्या मोजदाद समितीचे सदस्य तथा भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केली आहे. (हेही वाचा - Siddhivinayak Mandir Darshan Timings On New Year: नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी 'या' वेळेत खुलं असणार प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिर!)
तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट व इतर काही माैल्यवान दागिने गायब असल्याचा दागिने तपासणी समितीस आढळले. तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. तुळजाभवानी मंदिरातील प्राचीन दागदागिन्यांची तपासणी करण्यासाठी 16 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दोन महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला आहे.
तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दुर्मिळ दागिने एकूण सात डब्यांत ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचे वय 300 वर्षांपासून ते 900 वर्षांपर्यंत जुने आहे. दागिने तपासणी समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक अनागोंदी असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात दोषी कोण हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करते आहे. त्या समितीचा अहवालही एक-दोन दिवसांत येईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घ्यायची का, यावर निर्णय घेतला जाईल. असे धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी म्हटले आहे.