IPL Auction 2025 Live

Shivshahir Babasaheb Purandare Passes Away: बाबासाहेबांच्या निधानानंतर राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यानं कडून श्रद्धांजली अर्पण, बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी

तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

बाबासाहेब पुरंदरें (Photo Credit - Twitter)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल आहे. आज सोमवारी पहाटे  वाजून 7 मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते 100 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

बाबासाहेबांच्या निधानानंतर राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यानं कडून श्रद्धांजली अर्पण

 

बाबासाहेबांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. बाबासाहेबांनी हयातभर शिवचरित्राचा ध्यास घेतला होता. शिवचरित्र सांगणं, ते लिहिणं आणि राजा शिवछत्रपतींचे विचार सगळ्यांपर्यत पोहचवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. या कामासाठी त्यांना राज्यातील जनतेनं मोठा प्रतिसाद दिला.