Truck Driver Strike Petrol Shortage: राज्यभरात इंधन टंचाई, मुंबईतील अनेक पेट्रोलपंप बंद हण्याची शक्यता
केंद्राच्या नव्या कायद्याप्रमाणे आता इंधन टँकर वा ट्रकचा अपघात झाल्यास आणि चालक अपघातस्थळावरून पळून गेल्यास चालकाचा जामीन न होता थेट दहा वर्षे तुरुंगवास व 7 लाख रुपये दंड अशी तरतूद
केंद्र सरकारविरोधत ट्रक-टँकर चालकांनी (Truck Driver Strike) पुकारलेल्या संपामुळे राज्यातील इंधनपुरवठ्यावर ब्रेक (Petrol Shortage) लागला आहे. याचा परिणाम मुंबईतही (Mumbai) दिसू लागले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील 210 पैकी निम्मे पंप बंद होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सर्व पंप ठप्प होणार असल्याची माहिती पेट्रोल पंप मालक असोसिएशनने दिली आहे. या संपामुळे मनमाड परिसरातील तेल प्रकल्पातून राज्यातील तब्बल 12 जिल्ह्यांत होणारा इंधनपुरवठा ठप्प झाला असून, इंधनटंचाईचे संकट ओढवले आहे. (हेही वाचा - Truck Drivers Protest in Maharashtra: ट्रक चालकांच्या संपाचा आज दुसरा दिवस; इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालकांची तोबा गर्दी)
केंद्राच्या नव्या कायद्याप्रमाणे आता इंधन टँकर वा ट्रकचा अपघात झाल्यास आणि चालक अपघातस्थळावरून पळून गेल्यास चालकाचा जामीन न होता थेट दहा वर्षे तुरुंगवास व 7 लाख रुपये दंड अशी तरतूद असल्याचे टँकर चालकांचे म्हणणे आहे. याला टँकरचालकांनी तीव्र विरोध दर्शविला असून, हा कायदा मागे घेण्यासाठी टँकरचालकांनी सोमवारी सकाळी संपाचे हत्यार उपसले आहे.
सोमवारी नेहमीप्रमाणे तिन्ही कंपन्यांत इंधन टँकर भरण्याचे काम सुरू होण्यापूर्वी चालकांनी आदल्या दिवसापासून इंधन भरण्यासाठी आलेल्या टँकरचालकांना टँकर भरून कंपनीतून रवाना केले. अवघे पाच-सहा टँकर भरून झाल्यावर या टँकरचालकांनी अचानक काम बंदचा पुकारा केला.