IPL Auction 2025 Live

Traffic Route Change in Pune today: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज वाहतूक मार्गात बदल, घ्या जाणून

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. परिणामी पुणे शहरात वाहतूक मार्गात बदल (Traffic Route Change in Pune today) करण्यात आला आहे.

Traffic प्रतिकात्मक छायाचित्र (Photo credits: PTI)

PM Narendra Modi Visit Pune: लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मदी आज (1 जुलै) पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. परिणामी पुणे शहरात वाहतूक मार्गात बदल (Traffic Route Change in Pune today) करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विरोधकांनी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पोलीस आणि पुणे पोलिसांनी पंतप्रधानांचा ताफा जाणार असलेल्या मार्गावर पाहणी केली आहे. तसेच, या मार्गावरुन रंगीत तालीमही घेण्यात आलीआहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा आणि कार्यक्रम

वहतूक मार्गात बदल झालेले रस्ते

बंद रस्ते: पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, अलका चौक, टिळक रस्ता, जेधे चौक, संगमवाडी रोड , विमानतळ रोड दुपारी 3 पर्यंत बंद आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे अवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे. (हेही वाचा, Lokmanya Tilak Award Ceremony Pune: PM नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार, शरद पवार राहणार कार्यक्रमास उपस्थित)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी तब्बल 300 फलक लावले आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आक्रमक झाली आहे. मणीपूर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अवाक्षर बोलत नसल्याने काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान येणार म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन अतिशय सतर्क झाले आहे. प्रशासनाने शहरात तब्बल 7 हजार पोलीस तैनात केले आहेत.