पुणे-सातारा- नाशिक मार्गावर वाहतुक कोंडी, प्रवाशांची तारांबळ

विकेंड आणि नवीन वर्ष स्वागतासाठी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांमुळे पुणे- सातारा आणि पुणे- नाशिक मार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ होऊन वैतागले आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons, Lakun.patra)

विकेंड आणि नवीन वर्ष स्वागतासाठी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांमुळे पुणे- सातारा आणि पुणे- नाशिक मार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ होऊन वैतागले आहेत.

पुणे-नाशिक मार्गावर घाटरस्त्यावर कंटेनर बंद पडल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली आहे. तर पुणे-सातारा मार्गावर टोल नाक्यामुळे वाहतुक रांगा लागल्या आहेत. तसेच वाहतुक नियोजनाच्या अभावी प्रवाशी संतापले आहेत. पुणे-सातारा मार्गावरील खेड-शिवापुर टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे तसेच.पुणे-नाशिक मार्गावर वाहनांची गर्दी झाल्याने दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

या वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये निराशा दिसून येत आहे. तसेच टोल नाक्यावर एक किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement