Konkan Railway: कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, मुसळधारपावसामुळे रुळांवर माती

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान रुळावर मोठ्याप्रमाणावर माती आणि गाळ आला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. माडवीकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तासांहून अधिक काळ जवळपास पूर्णपणे ठप्प होती.

Indian Railways | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Heavy Rains in Konkan: मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेलाही (Konkan Railway) बसला आहे. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान रुळावर मोठ्याप्रमाणावर माती आणि गाळ आला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. माडवीकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तासांहून अधिक काळ जवळपास पूर्णपणे ठप्प होती. आगोदरच मुसळधार पाऊस. त्यात पुन्हा रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नराजी पाहायला मिळाली.

संपूर्ण महाराष्ट्रातच पाठिमागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. कोकणात तर संततधारच सुरु आहे. खास करुन चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाठिमागचे आठ दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी नद्यांसह उपनद्या, वहाळ दुथडी भरुन वाहत आहेत. त्यातच फटका कोकण रेल्वेला गुरुवारी (ता. 14) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बसला. खास करुन चिपळून ते ते अंजनीच्या दरम्यान डोंगरातील माती रुळावर आली आणि मार्ग बंद झाला. मातीचा ढीगारा उपसून मार्ग मोकळा करेपर्यंत वाहतूक ठप्प झाली. (हेही वाचा, Mumbai Thane Heavy Rains: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, पाणीपुरवठा आणि जनजीवन विस्कळीत)

कोकण रेल्वे प्रशासनाला मातीचा ढीगारा साचलेल्या ठिकाणी जाऊन तो दूर करेपर्यंत वाहतूक ठप्प राहिली. मातीचा ढिगारा उपसून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.. अद्यापही वाहतूक धिम्या गतीनेच सुरु आहे. मातीच्या ढिगाऱ्याने मार्ग बंद झाल्याने चिपळूण ते खेड दरम्यान वाहतूक थांबविण्यात आली होती. दुसऱ्या बाजूला . मुंबईहून मडगावकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली होती. तर चिपळूण स्थानकात मुंबईकडे जाणारी एक एक्स्प्रेस सुद्धा रोखण्यात आली होती.