Pune Traffic Diversion: मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीनिमित्त पुण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल; अनेक भागातील रस्ते बंद

जरांगे मराठा आरक्षणासाठी ठाम असून आज सकाळी 8 वाजता सारसबाग येथील गणपतीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात करतील.  संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजी पुतळा येथे जरांगे यांच्या रॅलीची सांगता होईल.

Photo Credit- X

Pune Traffic Diversion: ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावे या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली(Manoj Jarange Rally) आज पुण्यात होणार आहे. जरांगे (Manoj Jarange Patil)मराठा आरक्षणासाठी ठाम असून आज ते सारसबाग येथील गणपतीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात करतील. त्यानंतर डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर रॅलीची सांगता होईल. सकाळी 11 वाजता शांतता रॅली सुरु होणार आहे. (हेही वाचा: Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिले ही शासनाची भूमिका, विकासाच्या प्रश्नांबाबत काढला जातोय चर्चेतून मार्ग- Devendra Fadnavis)

जरांगे यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे बांधव जमण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी वाहतूकीतील बदल लक्षात घेऊन घराबाहेर निघण योग्य ठरेल. मनोज जरागेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. आज दुपारी 12 वाजता शांतता रॅली सारसबाग येथून सुरु होईल. संध्याकाळी सहा वाजता डेक्कनच्या खंडुजी बाबा चौकात रॅलीचा समारोप होईल. (हेही वाचा: Maratha Reservation: मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत 10% आरक्षण; विधेयक एकमताने मंजूर)

मनोज जरांगे यांची शांतता रॅली टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल मार्गावरून जाणार आहे. पुढे ही रॅली एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता मार्ग डेक्कन जिमखाना भागात पोहचणार आहे.

शहरातील वाहतुकीतील बदल

दांडेकर पूल - सिंहगड रस्त्यावरून येणारे वाहतूक दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक व

व्होल्गा चौक अशी वळविण्यात येणार आहे.

निलायम पूल - सावरकर पुतळ्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

ना. सी फडके चौक - सणस पुतळ्याकडे जाणारी वाहतूक बंद राहील

एस पी कॉलेज चौक - पूरम चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील

शिवाजी रस्ता - राष्ट्रभूषण चौकाद्वारे वाहने वेगा सेंटरमार्गे रवाना केली जातील

सेव्हन लव चौक - जेधे चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ही वाहने

मार्केटयार्ड किंवा पुणे स्टेशनकडे नेहरू रस्त्याने सोडली जाणार आहेत.

मार्केटयार्ड जंक्शन - जेधे चौकाकडे वाहतूक बंद राहणार असल्याने वाहने वखार महामंडळ मार्गे

सोडली जाणार आहेत.

पंचमी चौक - पंचमी चौक ते जेधे चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहने पंचमी ते शिवदर्शन चौक, शिवदर्शन ते गजानन महाराज मंदिर चौक ते निलायम टॉकीज मार्गे सोडली जाणार आहेत.

शिवदर्शन चौक - मित्रमंडळ चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील

मनोज जरांगे यांची रॅली जंगली महाराज रस्त्यावर आल्यानंतर होणारे बदल

गुडलक चौक - नटराज चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील.

झेड ब्रीज - केळकर रस्त्यावरून येणारी वाहतूक बंद राहील.

भिडे पूल - पुलाची वाडी येथून जंगली महाराज रोडकडे जाणारी वाहतूक बंद राहील

नळस्टॉप चौक - खंडोजीबाबा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील

रसशाळा चौक - एसएम जोशी पुलाकडील वाहने नळस्टॉप मार्गे जातील

शेलारमामा चौक - शेलारमामा चौकाकडून खंडोजीबाबा चौकाकडे वाहतूक बंद राहील

मनोज जरांगे यांची रॅली खंडोजीबाबा चौकात आल्यानंतर होणारे बदल

टिळक चौक - खंडोजीबाबा चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील

वाहने कुमठेकर रस्ता व टिळक रस्त्याने सोडली जातील.

मनोज जरांगे यांची रॅली पुढे जाईल तशी मागील चौकातील वाहतुक खुली केली जाणार आहे.

छत्रपती संभाजी पुतळा येथे जरांगे यांच्या रॅलीची सांगता होईल. त्यामुळे शहरातील वाहतुकीत करण्यात आलेले बदल लक्षात घेणे महत्त्वाचे असून पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिले आहेत. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असं आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif