माथेरान येथे दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू
माथेरान येथील दरीत कोसळून एका पर्यटक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
माथेरान येथील दरीत कोसळून एका पर्यटक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी माथेरान येथील बेल्व्हीडीयर पॉईंट येथे फिरत असताना दगडाची ठेच लागून तोल गेल्याने महिला 800 फूट खोल दरीत कोसळली. संगीता मिश्रा असे या मृत महिलेचे नाव आहे.
मुंबईहून पती, दोन मुली आणि एका मित्रासह माथेरान येथे त्या फिरण्यास गेल्या होत्या. त्यावेळेस ही दुर्घटना घडली. अपघातानंतर स्थानिक पोलिस आणि माथेरान मधील सह्याद्री बचाव पथक यांच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दरीत महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. (800 फूट दरीत कोसळून भारतीय इंजिनियर दांम्पत्याचा मृत्यू)
यापूर्वी देखील दिल्लीहून माथेरान येथे फिरायला आलेल्या एक 33 वर्षीय महिला दरीत कोसळली होती. सेल्फी घेत असताना 500 फूट दरीत कोसळून या महिलेचा मृत्यू झाला होता.