Today's Gold Rate/Price in Maharashtra: सोन्याचा आजचा भाव किती? जाणून घ्या महाराष्ट्रातील विविध शहरांतील दर
संपूर्ण देशाचा विचार करायचा तर भारतात आज प्रती 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने दर 06,150 रुपये इतका आहे. तर कालच्या तुलनेच 22 कॅरेटचे सोने हे वृत्त लिहीत असताना प्रती 10 ग्रॅम 380 रुपयांनी वधारले होते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांती सोने दर खालील प्रमाणे.
Gold Price in Different Cities of Maharashtra: कितीही महाग झाले तरी भारतीय नागरिकांचे सोने धातूवर असलेले प्रेम तसूभरही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सोन्याचा आजचा भाव किती? हा प्रश्न अपवाद वगळता जवळपास सर्वांनाच पडलेला असतो. त्यामुळेच तर सोने, चांदीच्या दरावर प्रसारमाध्यमांचेही बारीक लक्ष असते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने धातूचे दर सातत्याने बदलत असतात. ज्याचा भारतीय बाजारावरही प्रचंड मोठा परिणाम होताना दिसतो. सहाजिक भारतातही या धातूचे दर दररोज बदलते राहतात. नाही म्हणायला हे दर काही काळ स्थिरही राहतात. पण अलिकडील काळात आर्थिक क्षेत्रात होत असलेल्या मोठ्या उलथापालथीमुळे हे दरही हेलकावे खाताना दिसतात. पाठिमागील काही काळापासून सोने दर हे प्रचंड चढे राहिले आहेत. जाणून घ्या महाराष्ट्रात सोन्याचा आजचा भाव काय चालला आहे.
संपूर्ण देशाचा विचार करायचा तर भारतात आज प्रती 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने दर 06,150 रुपये इतका आहे. तर कालच्या तुलनेच 22 कॅरेटचे सोने हे वृत्त लिहीत असताना प्रती 10 ग्रॅम 380 रुपयांनी वधारले होते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांती सोने दर खालील प्रमाणे.
मुंबई शहर
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 60,400 रुपये
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 55,370 रुपये
पुणे शहर
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 60,000 रुपये
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 55,000 रुपये
नागपूर शहर
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 60,000 रुपये
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 55, 000 रुपये
सोलापूर शहर
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 60,030 रुपये
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 55,000 रुपये
कोल्हापूर शहर
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 60,000 रुपये
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 55,000 रुपये
ठाणे शहर
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 60,000 रुपये
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोने दर 55,000 रुपये
(टीप- वरील सर्व दर गुड रिटर्न्स बेवसाईटवर दिलेल्या माहितीनुसार)
दरम्यान, वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)