Maharashtra Heat Wave: मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

मुंबईच्या अनेक भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत स्थानिक कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

आज हवामान विभागाकडून मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हा देण्यात आला आहे. मागील आठवड्यांप्रमाणे हा आठवडा कोरडा आणि उष्ण असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमान कमी होऊन नागरिकांना दिलासा हा मिळू शकतो. दक्षिणेकडील काही राज्यांना या आठवड्यात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे उष्णतेची लाट लक्षात घेता नागिरकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे. नागिरकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, सुती कपड्यांचा वापर करावा, जास्तीत जास्त पाणी प्यावी, असे आवाहन केले जात आहे.  (हेही वाचा - Maharashtra Heatwave: कोकणासह मराठवाड्यात उष्णतेची लाट, नागिरकांना काळजी घेण्याचे आवाहन)

राज्यातील काही भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअस पार जाणार असल्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत स्थानिक कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. 4 आणि 5 मे रोजी कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

5 मे रोजी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि अंतर्गत कर्नाटक या भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हलके आणि सैल कपडे घालण्याचा सल्लाही आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्वचा ओली ठेवा आणि थंड शॉवर घ्या. अति उष्णतेच्या दिवसांमध्ये हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे, म्हणून पुरेसे पाणी पिण्याची आणि घराबाहेर जास्त शारीरिक हालचाली टाळण्याचं आवाहनही केलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif