COVID-19 Cases in Dharavi: धारावीत 2 नव्या रुग्णांसह या भागात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2713 वर- BMC
धारावी (Dharavi) परिसरात असून आज दिवसभरात 2 नवे रुग्ण आढळले असून या परिसरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 2713 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून राज्यात सर्वाधिक संख्या मुंबईत आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 1 लाख 36 हजार 348 रुग्ण आढळले असून 7 हजार 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण धारावी (Dharavi) परिसरात असून आज दिवसभरात 2 नवे रुग्ण आढळले असून या परिसरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 2713 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. सद्य घडीला धारावीतील 83 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.
हेदेखील वाचा- Coronavirus In Mumbai: मुंबईत आज आणखी 991 नव्या रुग्णांची नोंद; 34 जणांचा मृत्यू
एकेकाळी मुंबईतील कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे विभाग आता आटोक्यात आल्याचे चित्र आहे. वरळी, वांद्रे, भायखळा, नागपाडा, कुर्ला, माटुंगा, वडाळा, देवनार, मानखुर्द हे भाग आता रुग्णवाढीत सगळ्यात खालच्या क्रमांकावर आले आहेत.