टिटवाळा: गोळ्यांनी भरलेली पिस्तुल मुलाच्या हट्टापायी दिली हातात, व्हिडिओ बनवत ठेवला WhatsApp Status
तर एवढेच नव्हे काढलेला व्हिडिओ तो व्हॉट्सअॅपवर स्टेटस म्हणून ठेवण्यात आला आहे.
टिटवाळा (Titwala) येथील एका रहिवाश्याने मुलाच्या हट्टापायी हातात गोळ्या भरलेली पिस्तुल देत त्याचा व्हिडिओ काढला आहे. तर एवढेच नव्हे काढलेला व्हिडिओ तो व्हॉट्सअॅपवर स्टेटस म्हणून ठेवण्यात आला आहे. या प्रकारानंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच भरलेल्या गोळ्यांच्या पिस्तुल चुकून चालवली गेली असता मोठा अनर्थ झाला असता याचा विचारसुद्धा त्या व्यक्तीने केला नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ग्रेटर व्हॅली स्कूलच्या ट्रस्टीच्या पती आदर्श उपाध्याय याने आपल्या चिमुरड्या मुलाच्या हातात गोळ्या भरलेली पिस्तुल दिली. मात्र मुलाचा हट्ट होता म्हणून त्याला मी ती पिस्तुल दिली असे उपाध्याय यांनी TV9 या मराठी वृत्तवाहिनीला स्पष्टीकरण दिले आहे. त्याचसोबत मला कोणताही प्रश्न विचारु नये आणि उत्तर देण्यासाठी दबाब आणू नये अशी भुमिका उपाध्याय यांनी मांडली.
तर पिस्तुलात 3 जीवंत काडतुसे भरली होती. त्याच स्थितीत त्याने आपल्या मुलाच्या हातात पिस्तुल दिल्याने चांगलाच रोष उपाध्याय यांच्या विरुद्ध व्यक्त केला जात आहे. तसेच व्हिडिओत पिस्तुलात काडतुसे कशी टाकायची याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिसून आले आहे.