पत्नीसोबत झालेल्या भांडणातून शुक्रवारी रात्री वाशी गावातील 29 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केली. पती-पत्नीमधील घरगुती भांडणानंतर पत्नी पाच वर्षांच्या मुलासह घराबाहेर पडली. त्यानंतर शुक्रवारी रात्री मुलासह पुन्हा ती घरी आली. मात्र कडी वाजवूनही पती दरवाजा उघडत नव्हता. अर्ध्या तासाहून अधिक वेळ बाहेर उभं राहिल्यानंतर तिने घरात जाण्याचा निर्णय घेतला. घरात गेल्यावर पती लटकलेल्या अवस्थेत दिसला. पत्नीने आरडाओरडा करून जवळच्या रहिवाशांना मदत मागितली आणि तिच्या नातेवाइकांनाही बोलावले. हेही वाचा Mumbai: जुना वर्गमित्र मागील सात वर्षापासून सतत करत होता पाठलाग, कंटाळलेल्या तरुणीची पोलिसात तक्रार, एकास अटक
त्यानंतर त्यांनी येऊन पतीला खाली आणले आणि वाशी महापालिका रुग्णालयात नेले. वाशी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्याला दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले आणि आम्ही फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 174 नुसार गुन्हा दाखल केला.