World Environment Day 2025: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत 'टिक टिक प्लास्टिक' मोहिम सुरू; BMC ने प्रदर्शित केला 'प्यासा' लघुपट (Watch Video)

बृहन्मुंबई महानगरपालिका, भामला फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. 'प्लास्टिकचा वापर टाळा आणि पृथ्वी वाचवा...' या घोषणेखाली प्लास्टिक प्रदूषण टाळण्याचा महत्त्वपूर्ण संदेश पसरवण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.

BMC releases Pyaasa short film | X/@mybmc

World Environment Day 2025: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day 2025) मुंबईत 'टिक टिक प्लास्टिक' (Tik Tik Plastic) नावाची एक पर्यावरण जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, बॉलीवूड अभिनेता अजय देवगण ( Ajay Devgn) यांचा एक लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. 5 जून 2025 रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनापूर्वी, बीएमसीने रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर हा लघुपट शेअर केला. बृहन्मुंबई महानगरपालिका, भामला फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. 'प्लास्टिकचा वापर टाळा आणि पृथ्वी वाचवा...' या घोषणेखाली प्लास्टिक प्रदूषण टाळण्याचा महत्त्वपूर्ण संदेश पसरवण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.

हा लघुपट प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या निकडीवर भर देतो. या मोहिमेचा उद्देश पर्यावरण, सागरी जीव आणि मानवी आरोग्यावर प्लास्टिक कचऱ्याच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. आकर्षक दृश्य कथाकथनाच्या माध्यमातून, 'टिक टिक प्लास्टिक' मोहीम प्रेक्षकांना पृथ्वीच्या संरक्षणाचे आवाहन करते.

बीएमसीने रिलीज केली प्यासा शॉर्ट फिल्म - 

'टिक टिक प्लास्टिक' मोहिम -

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी एक सर्जनशील आणि सहयोगी प्रयत्न म्हणून 'टिक टिक प्लास्टिक' नावाचा जागतिक उपक्रम सुरू करण्यात आला. ही मोहीम संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी), भामला फाउंडेशन आणि रविन ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम आहे.

दरम्यान, शुक्रवारी खार येथील बीएमसी एच-वेस्ट वॉर्ड कार्यालयात हा लाँच कार्यक्रम झाला, जिथे अभिनेता अजय देवगण यांचा समावेश असलेल्या 'अर्थिंग' आणि 'प्यासा' या दोन प्रभावी लघुपटांचे अनावरण करण्यात आले. या लघचित्रपटाद्वारे पर्यावरणाच्या संवर्धनाचा आणि तसेच लोकांना प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement