अभिनेता शाहरुख खान याचा बंगला उडवून देण्यासह महाराष्ट्र पोलिसांना ही दिली होती धमकी, तरुणाला जबलपुर येथून अटक

अभिनेता शहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बंगला आणि अन्य काही महत्वपूर्ण ठिकाणे उडवून देणाची धमकी देणाऱ्या तरुणाला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक करण्यात आली आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अभिनेता शहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बंगला आणि अन्य काही महत्वपूर्ण ठिकाणे उडवून देणाची धमकी देणाऱ्या तरुणाला मध्य प्रदेशातील जबलपूर येथून अटक करण्यात आली आहे. जबलपुर पोलिसांच्या मते, तरुणाने महाराष्ट्र पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन करत मुंबईतील विविध ठिकाणी दहशतवादी हल्ला आणि बॉम्ब स्फोट करण्याची धमकी दिली होती. संजीवनी नगर ठाणे पोलिसांच्या मते तरुणीने 6 तारखेला पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करुन धमकी दिली होती.

जितेश ठाकूर असे आरोपीचे नाव असून त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे, जितेश हा संजीवनी नगर ठाणे क्षेत्रातील गंगा नगर परिसरात राहत होता. 6 तारखेला त्याने महाराष्ट्र पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केला होता. त्याचसोबत अन्य ठिकाणी बॉम्ब स्फोट करण्याचे म्हटले होते.(Ashish Shelar Threat Call Case: आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई क्राइम ब्रँचकडून अटक)

महाराष्ट्र पोलिसांनी जेव्हा जितेश ठाकूर याला ट्रेस केले असता त्याचे लोकेशन जबलपुर दाखवले गेले. त्यानंतर पोलिसांनी तेथील पोलिसांना संपर्क केला असता ते तेथे अलर्ट झाले. आरोपी तरुणाला अटक केली असून यापूर्वी सुद्धा त्याने मुख्यमंत्री मदतक्रमांक आणि 100 क्रमांकावर फोन करुन त्रास दिला होता. दारु प्यायल्यानंतर तरुण सीएम हेल्पलाइन क्रमांक आणि 100 क्रमांकावर फेक कॉल करतो. आरोपीला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.