Driving Licence Renewal नियमांमध्ये झाला हा मोठा बदल; असे नाही केले तर पुन्हा द्यावी लागेल लर्निंग टेस्ट
नव्या नियमानुसार, तुमचा वाहन चालक परवाना एका वर्षापेक्षा अधिक कालबाह्य झाला असेल तर, तुम्हाला पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे.
महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यांर्गत (RTO) वाहन चालक (Driving Licence) परवानात मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार, तुमचा वाहन चालक परवाना एका वर्षापेक्षा अधिक कालबाह्य झाला असेल तर, तुम्हाला पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला लर्निंग टेस्टही (Learning Test) द्यावी लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराला 30 दिवस दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, वाहन चालक परवाना कालबाह्य झाले असताना वाहतूक पोलिसांनी तुम्हाला पकडले तर, 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.
आरटीओच्या अधिकारी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात राज्यातील 50 आरटीओत हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, वाहन चालक परवाना नुतनीकरण अर्ज करण्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येईल. ज्याप्रकारे नवीन वाहन चालक परवान्यासाठी अर्ज केला जातो, तसेच वाहन चालक परवाना 1 वर्षापेक्षा अधिक कालबाह्या झाला असेल, अशा अर्जदारालाही नवीन अर्ज भरावा लागणार आहे. एवढेच नव्हेतर त्यांना लर्निंग टेस्टही द्यावी लागणार आहे. हे देखील वाचा- सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द
तथापि, आता आपण आपल्या मूळ स्थानाची रहिवासी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड प्रत सबमिट करुन महाराष्ट्रात कोठूनही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता. त्याचप्रमाणे, जर तुम्ही मुंबईत कार बुक केली असेल तर तुम्ही तुमच्या आरटीओच्या पत्त्याचा पुरावा देऊन शहर आरटीओमध्ये नोंदणी करू शकता. दिवाळीला इथे बरेच लोक नवीन वाहने खरेदी करतात आणि अंधेरी आरटीओमध्ये नोंदणी करतात. महत्वाचे म्हणजे, आता नोंदणी प्रमाणपत्रात होम सिटीचा पत्ता दिसेल.