मुंबई: तोंडात अंमलीपदार्थ कोंबून महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
आरोपींच्या धमकीला भिक न घालता पीडितेने हिंमत एकवटली आणि कुर्ला पोलीस स्थानकात (Kurla Police Station) तक्रार दिली. पीडितेने 1 जानेवारी रोजी पीडितेने तक्रार देताच पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर तक्रारीवरुन तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला. तपासचक्र वेगाने फिरवत पोलिसांनी त्याच दिवशी (1 जानेवारी) दोन आरोपींना ताब्यात घेतले.
थर्टी फर्स्टच्या (Thirty First Night) दिवशी एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना पुढे आली आहे. मुंबईतील कुर्ला पोलिसांनी (Mumbai-Police) या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. तर, तिसरा आरोपी फरार आहे. कुर्ला पोलिसांनी (Kurla Police) १ जानेवारी या दिवशी ही कारवाई केली. मुख्तार शेख (३९) आणि शाहिद आरिफ(४८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री अडिच वाजण्याच्या सुमारास पीडित महिला शौचासाठी घराबाहेर पडली होती. दरम्यान, सार्वजनिक शौचालयाजवळ थांबलेल्या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांच्या हवाल्याने मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, पीडिता सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी गेली होती. दरम्यान, तिघांनी तिला आडवले. एकाने तिचे हात मागे घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर एकाने तिच्या तोंडात अंमलीपदार्थ कोंबले. तर एकाने तिचे तोंड दाबून धरले. थोड्या वेलात पीडितेचे स्वत:वरील नियंत्रण सुटले. तिघांनी तिला एका खोलीत नेले व तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, पीडितेला सकाळी थोडीफार शुद्ध आल्यावर घडला प्रकार तिच्या ध्यानात आला. दरम्यान, घडल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास आरोपींनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली. (हेही वाचा, बायकोचा सेक्स व्हिडिओ नवऱ्याने पाहिला, मुलांसमोर झाडल्या गोळ्या)
दरम्यान, आरोपींच्या धमकीला भिक न घालता पीडितेने हिंमत एकवटली आणि कुर्ला पोलीस स्थानकात (Kurla Police Station) तक्रार दिली. पीडितेने 1 जानेवारी रोजी पीडितेने तक्रार देताच पोलिसांनी तिची वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर तक्रारीवरुन तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला. तपासचक्र वेगाने फिरवत पोलिसांनी त्याच दिवशी (1 जानेवारी) दोन आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, तिसरा आरोपी फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2019 05:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

