Sanjay Raut यांना दोन दिवस आरामाचा सल्ला; 'हे' चार नेते सांभाळणार त्यांची जबाबदारी

संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याने त्यांच्यावरची जबाबदारी काही काळासाठी शिवसेनेतील इतर नेत्यांवर देण्यात आली आहे.

Sanjay Raut (Photo Credits-ANI)

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना नुकतंच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक छातीत दुखायला सुरुवात झाल्याने त्यांना रुग्णालयात (Sanjay Raut in hospital) नेण्यात आलं. आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील 2 दिवस विश्रांतीची सक्त गरज आहे. त्यामुळेच ते पुढील २ दिवसात कोणालाही भेटणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहेत.

संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याने त्यांच्यावरची जबाबदारी काही काळासाठी शिवसेनेतील इतर नेत्यांवर देण्यात आली आहे. संजय राऊत यांची जबाबदारी पक्षाकडून एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

गेले काही दिवस संजय राऊत खूपच चर्चेत होते. शिवसेना पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडण्याचे काम ते करत होते. अशा वेळेत त्यांनी भाजप पक्षावर तसेच नेत्यावरही टीका केल्या असल्याने भाजपमधील अनेकजण त्यांच्यावर नाराज होते.

रोज पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक विधानं करणारे संजय राऊत सत्ता स्थापाच्या अंतिम संघर्षाच्या अंतिम घडीला मात्र हॉस्पिटलमध्ये आहेत.

संजय राऊत हॉस्पिटलमध्ये दाखल; छातीत वेदना होत असल्याने पुढचे दोन दिवस कोणालाही भेटणार नाहीत

दरम्यान त्यांच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेला सत्ता मिळण्यासाठी शक्यतेवढे प्रयत्न करताना दिसत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif