No Water Supply In Pune: पुण्यातील अनेक भागांमध्ये 1 डिसेंबरला पाणीपुरवठा होणार नाही, पुणे महानगरपालिकेची माहिती

बाणेर, बालेवाडी, पाषाण, कर्वेनगर, कोथरूड, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, डहाणूकर कॉलनी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रोड, खडकी कॅन्टोन्मेंट, मुळा रोड, वारजे आणि शिवणे परिसरात पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

बाणेर, बालेवाडी, पाषाण, कोथरूड, शिवाजीनगर भागात गुरुवारी पाणीपुरवठा (Water Supply) होणार नाही. पुणे महानगरपालिकेने (PMC) गुरुवारी विविध टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांवर (Water treatment plants) विद्युत दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाचे नियोजन केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बाणेर, बालेवाडी, पाषाण, कर्वेनगर, कोथरूड, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, डहाणूकर कॉलनी, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सुस रोड, खडकी कॅन्टोन्मेंट, मुळा रोड, वारजे आणि शिवणे परिसरात पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. हेही वाचा Aadhaar Card Data: महाराष्ट्रातील शाळांमध्ये नोंदणी केलेल्या 2.3 कोटी विद्यार्थ्यांपैकी 8 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांकडे आधार नाही- Report

या जलयुक्तच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या काही भागात पाणी मिळणार नाही, तर अनेक भागाला कमी दाबाने पाणी मिळणार आहे, असे निवेदनात सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif