Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे गटाची याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय म्हटले न्यायालय?
त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखालील गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) तातडीने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.
'शिवसेना' (Shiv Sena) हे पक्षानेच नाव आणि निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' निवडणूक आयोगाने (Election Commission of India) एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखालील गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) तातडीने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतू, ही याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच, हे प्रकरण आपण उद्या (21 फेब्रुवारी) दाखल करावे असा सल्लाही कोर्टाने ठाकरे गटाला दिला.
दरम्यान,निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच कॅव्हेट अर्ज दाखल केला आहे. जेव्हा एखाद्या प्रकरणात एका पक्षाविरुद्ध दुसरा पक्ष न्यायालयात याचिका दाखल करतो किंवा करण्याची शक्यता असते तेव्हा एक गट आपली बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये यासाठी न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करतो. त्याला कॅव्हेट असे म्हटले जाते. कॅव्हेट ही एक प्रक्रियेवर आधारीत असलेली संकल्पना आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात बोलावली महत्त्वाची बैठक, राजकीय वर्तुळात उत्सुकता)
शिवेसना पक्षात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर हा वाद भारतीय निवडणूक आयोगाच्या दाराच पोहचला. दोन्ही गटांनी शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह आपणास मिळावे यासाठी आयोगाकडे युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आश्चर्यकारक निर्णय घेतत शिवसेना आणि धुनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे आणि राज्यातील जनतेसाठी हा मोठा धक्का होता. ज्यामुळे हा गट सर्वोच्च न्यायालयात गेला.
निवडणूक आयोगाचा निर्णय येताच ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणूक आयोग आणि देशातील विविध यंत्रणा या भारतीय जनता पक्षाच्या हस्तक आणि गुलाम झाल्या आहेत, असा हल्ला ठाकरे गटाने चढवला. दरम्यान, गेल्या महिन्यात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावरील त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदने सादर केली. त्यानंतर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 'धगधगती मशाल' निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे गटाला देण्यात आले होते. तर, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला 'ठाल आणि तलवार' चिन्ह दिले होते.