Prithviraj Chavan On PM Narendra Modi: कोरोना, चीन प्रश्न, अर्थव्यवस्था या प्रश्नांवर 'मोदी सरकार' साफ अपयशी ठरलं आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधानांवर निशाणा

पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

Prithviraj Chavan (Photo Credits: Facebook)

Prithviraj Chavan On PM Narendra Modi: कोरोना, चीन प्रश्न, अर्थव्यवस्था या प्रश्नांवर 'मोदी सरकार' साफ अपयशी ठरलं आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा, देशाची परिस्थिती सध्या बिकट आहे हे खरयं. कोरोना, चीनसह अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार साफ अपयशी ठरले आहे. त्या सगळ्या अपयशाला झाकण्यासाठीच केंद्र सरकारने 6 महिने संसदेचे कामकाज बंद ठेवले. त्या सगळ्या अपयशांवर संसदेत चर्चा होऊ नये, हीच त्यामागची भूमिका होती, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Sharad Pawar on Suspension Of 8 Rajya Sabha MP: शरद पवार यांचा आज अन्नत्याग; राज्यसभा निलंबित 8 खासदारांना पाठिंबा देण्यासाठी निर्णय)

सध्या केंद्र सरकारची स्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. तुम्ही मोराबरोबर फोटो काढा, घोड्यावर बसा किंवा देवाची करणी म्हणा. तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. सरकार म्हणून ज्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करू शकलेले नाही. जगातील कोणत्याचं देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटलेले नाही. केवळ आपल्याचं सरकारने ते स्पष्ट केले आहे. चीन, कोरोनाची स्थिती व देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकार अपयश ठरले असून हे अपयश लपविण्यासाठीच त्यांनी 6 महिने संसद बंद ठेवली. तुम्हाला सध्याची स्थिती सावरता आलेली नाही. सरकार म्हणून ज्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करू शकलेले नाही. जगातील कोणत्याच देशाने कोरोनाला देवाची करणी म्हटलेले नाही. केवळ आपल्याचं सरकारने ते स्पष्ट केलं आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चीन प्रश्न, कोरोनाची स्थिती व देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारला साफ अपयश आले आहे. ते अपयश लपविण्यासाठीच त्यांनी सहा महिने संसद बंद ठेवली आहे. कोणत्याचं देशाने त्याचे कामकाज बंद ठेवले नव्हते. रशियात बंद होते. तेथे हुकमाशाहीचं आहे. मात्र, भारतात ते बंद ठेवले. कारण संसदेत त्या अपयशाची चर्चा त्यांना होऊ द्यायची नव्हती. संविधानात सहा महिन्यापेक्षाही जास्त काळासाठी संसदेचे कामकाज बंद ठेवता येत नाही, तशी तरतूद केली आहे. त्यामुळे त्यांनी सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरंटी नाही, अशा खोचक शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.