Healthcare Facilities: महाराष्ट्रात खेड्यापाड्यांत आणि दुर्गम भागापर्यंत उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पोहोचविण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंत्रालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात खेड्यापाड्यांत आणि दुर्गम भागापर्यंत उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा (Health Care And Medical Facilities) पोहोचविण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी विशेष आमंत्रित काही कोविड योद्धे, डॉक्टर, परिचारिका उपस्थित होत्या. तसेच मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्य मंत्री दीपक केसरकर देखील उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. हेच आपल्यासाठी स्वातंत्र्य योद्धे आहेत. या संकट काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. याचदरम्यान, पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे बजावले आहे. दुर्देवाने, आपले कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमावले आहेत. त्यांनाही उद्वव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच देशासाठी बलिदान देण्याऱ्या शहीद जवानांनादेखील त्यांनी अभिवादन केले आहे. हे देखील वाचा- पुणे: आपके राज्य में बिना परमिशन के आगये! ध्वजारोहण साठी गेलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांंचा अजित पवार यांना टोला (Watch Video)
देशात प्रथमच असा तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. जिल्ह्यातील डॉक्टरांचे सुद्धा टास्क फोर्स तयार केले .गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या तयार करून गावकरी आणि लोकांवरही जबाबदारी टाकण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 150 टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हटले आहेत.