समलैंगिक जोडी पहिल्यांदाच मुंबईत लग्नबेडीत अडकली

तर अशा रिलेशनशिप्सला समाजात मान्यता देण्यासाठी प्रयत्नही केले जातात. तर सर्वोच्च न्यायालयाने आयपीसीचे कलम ३७७ रद्द केला आहे. त्यामुळे अशाच एका समलैंगिक जोडीने त्यांचा विवाह नुकताच मुंबईत केला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्या तरुणाईंकडून समलैंगिक रिलेशनशिप्सबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. तर अशा रिलेशनशिप्सला समाजात मान्यता देण्यासाठी प्रयत्नही केले जातात. तर सर्वोच्च न्यायालयाने आयपीसीचे कलम ३७७ रद्द केला आहे. त्यामुळे अशाच एका समलैंगिक जोडीने त्यांचा विवाह नुकताच मुंबईत केला आहे. या लग्नात मुंबईतील एलजीबीटी समुहातील अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती.

रेनबो व्हॉइस या संस्थेचे संस्थापक विनोद फिलिप (Vinod Philip) आणि विन्सेंट (Vincent Illaire) या दोघांचा शाहीविवाह सोहळा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी हॉटेलच्या व्यवस्थापकांची उपस्थिती विशेष होती. मात्र मुंबईतील हा प्रथमच समलैंगिक विवाहसोहळा असल्याचे सांगितले जात आहे.

विनोद फिलीप हा तरुण दक्षिण भारतीय असून कट्टर ख्रिस्ती घराण्यात जन्मला आहे. तर विन्सेंट हा मूळचा फ्रान्सचा नागरिक आहे. या दोघांची ओळख एका अॅपच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर हळूहळू या मैत्रिचे प्रेमात रुपांतर होऊन लग्नबंधनात अडकण्याचा या दोघांनी विचार केला. परंतु विनोदने त्याच्या घरी समलैंगिक नात्याबद्दल सांगितले तेव्हा त्याला घरतील मंडळींनी विरोध केला. त्यानंतर घरातील मंडळींनी या दोघांचे नाते अखेर स्विकारले.

डिसेंबर 2018 रोजी या दोघांनी प्रथम फ्रान्समध्ये लग्न केले होते. तर विनोदन त्याच्या आयुष्याची काही वर्षे मुंबईत घालवल्याने त्याने पुन्हा मुंबईत लग्नबंधनात अडकणार असल्याचा निर्णय घेतला. या दोघांनी समलैंगिकांसाठी रेनबो व्हॉईस संस्थेच्या माध्यमातून प्रथम काम केले. त्यानंतर भारतात समलैंगिक रिलेशनशिप्सला मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा एकदा या दोघांनी लग्न करण्याचे ठरविले.